Nana Patole l ‘बीएमसी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपचा अहंकार नष्ट करेल ‘ | Sakal Media

2022-03-11 204

Nana Patole l ‘बीएमसी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपचा अहंकार नष्ट करेल ‘ | Sakal Media

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी १० मार्च रोजी सांगितले की, महाराष्ट्रातील जनता बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (भाजप) अहंकार नष्ट करेल.
“भाजपला 3 राज्यात पूर्ण बहुमत मिळाले आहे पण गोव्यात नाही. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व अजूनही मजबूत आहे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होईल. बीएमसी निवडणुकीत भाजपचा अहंकार नष्ट करण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करेल, असे पटोले म्हणाले